Advertisement

Ayushman Card : तुम्हीही करत असाल ‘या’ चुका तर आजच टाळा, नाहीतर होईल आर्थिक नुकसान

Ayushman Card : सरकारच्या अनेक योजनांचा सर्वसामान्य जनतेला फायदा होत आहे. त्यापैकी एक म्हणजे आयुष्मान कार्ड योजना. या योजनेमुळे नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत  उपचार मोफत घेता येतात. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी काही नियम आणि अटी आहेत.

अशातच ज्या नागरिकांकडे आयुष्मान कार्ड आहे त्यांनी सावध राहणे खूप गरजेचे आहे. नाहीतर त्यांचे बँक खाते काही मिनिटात रिकामे होऊ शकते. त्यासाठी त्यांनी काही चुका करणे टाळावे. या चुका कोणत्या आहेत याची सविस्तर माहिती घेऊयात.

टाळाव्या या चुका

नंबर १

ज्या नागरिकांना नवीन आयुष्मान कार्ड बनवायचे असेल तर त्यांना फसवणूक करणारे लोक कॉल, मेसेज किंवा ईमेल इत्यादीद्वारे संपर्क करतात. हे लोक नागरिकांना त्यांच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून त्यांची गोपनीय बँकिंग माहिती घेऊन बँक खाते रिकामे करतात. त्यामुळे अशा कॉल, मेसेज, ईमेलला उत्तर देणे टाळा.

नंबर २

त्याचवेळी जर तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवायचे असेल तर तुम्हाला कोणीही तुमची गोपनीय बँकिंग माहिती विचारू शकत नाही. जर कोणी तुम्हाला डेबिट कार्ड नंबर, एटीएम पिन, इंटरनेट बँकिंग आयडी आणि पासवर्ड यांसारखी माहिती विचारत असेल तर सांगू नका.

नंबर ३

तसेच फसवणूक करणारे तुम्हाला कॉल करून OTP पाठवतील. कधीच हा OTP सांगू नका, नाहीतर तुमचे खाते रिकामे झालेच म्हणून समजा.

नंबर ४

त्याशिवाय सर्वसामान्यांची केवायसीच्या नावावर बनावट कॉल करून फसवणूक केली जात आहे. कधीही जर तुम्हाला आयुष्मान कार्डच्या नावाने केवायसी कॉल आला तर तुमची गोपनीय माहिती त्यांना सांगू नका.from आर्थिक – Ahmednagar Live24 https://ift.tt/jnPR9Bz
via IFTTT

Post a Comment

0 Comments