Advertisement

भांबर्डा येथे एक हजार फळझाडांचे वृक्षारोपण


आजादी का॒ अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आगाखान सामाजिक संस्था, एमआयटी कॉलेज औरंगाबाद ब ग्रामपंचायत भांबर्डा यांच्या संयुक्‍त विद्यमाने भांबर्डा येथे शुक्रवारी (दि.१२) वृक्षारोपण करण्यात आले. 

या कार्यक्रमात प्रथम मान्यवरांचे वृक्ष आणि भारतीय ध्वज देऊन सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे सत्कार स्वरूपात दिलेल्या वृक्षांची मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. 

यात आंबा, चिंच, सीताफळ, जांभुळ, पेरू आदी फळवृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच ५०० फळझाडे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. असे एकूण 'एक हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. यावेळी एमआयटी कॉलेजचे प्राध्यापक महेंद्र कोंडकर, प्राध्यापक आप्रपाली त्रिभुवन, आगाखान सामाजिक संस्थेचे राजकुमार तोगरे, कार्यक्रम अधिकारी प्रेरणा देशमुख, क्षेत्र अधिकारी आकाश घुले, संदीप शिंदे, धोंडीराम पडूळ, दिव्यांग शिवराज, सरपंच इंदुताई पठाडे, ग्रामसेवक एच. एस. शहाळे, उपसरपंच सजन शिंदे, सुखदेब पठाडे, संतराम फुकटे, शालेय समिती अध्यक्ष भीमराव पठाडे, उपाध्यक्ष सोमीनाथ जाधव, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी दिवटे, कुंडलिक भवर, दौलत पठाडे, शामराव पठाडे, शिक्षक जिजा उकिर्डे, जीवन साळुंखे, हिवरे, निकम, डोंगरे, जिरे, बानखेडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
 

Post a Comment

0 Comments