0

इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी
केंद्र सरकारने कृषी विधेयके ही शेतकऱ्यांच्या हितासाठी केली आहेत पण विरोधक त्याबाबत शेतकरी मध्ये गैरसमज पसरवीत आहेत असे प्रतिपादन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री डॉ अनिल बोंडे यांनी दि.15 ऑक्टोंबर 2020 रोजी उस्मानाबाद येथे केले. भाजपा किसान मोर्चा आयोजित शेतकरी संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस तथा किसान मोर्चा प्रभारी आ.सुजितसिंह ठाकूर, आ.राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिल्हा प्रभारी रमेश पोकळे, माजी जिल्हाध्यक्ष तथा बुद्धिजीवी प्रकोष्ट दत्ताभाऊ कुलकर्णी, अँड.मिलिंद पाटील, अँड.व्यंकटराव गुंड, सतीश दंडनाईक, किसान मोर्चा सचिव रंगनाथ सोळंके, किसान मोर्चा संपर्क प्रमुख रामदास कोळगे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय पाटील, व्यासपीठावर उपस्थित होते. सध्या महाराष्ट्र मध्ये सगळीकडे पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे, राज्य सरकार आणखीही शेतकऱ्यांना मदत करत नाही,पंचनामे न करता कोल्हापूर पुरग्रस्तांसारखी मदत करावी, तसेच कृषी विधेयक बाबत शेतकरी वर्गात भाजपा कार्यकर्त्यांनी जागृती करावी असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रम पूर्वी मान्यवरांच्या हस्ते ट्रॅकटरचे पूजन करण्यात आले. यावेळी प्र.का.सदस्य अँड. अनिल काळे, अविनाश कोळी, नानासाहेब यादव, माजी जि.प.अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजीत देवकते, युवा मोर्चा अध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, कृ.उ. बा. समिती सभापती अरुण वीर, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, कळंब तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, महिला अध्यक्ष माधुरी गरड, राहुल काकडे, विनायक कुलकर्णी, प्रवीण पाठक, पूजा राठोड, पूजा देडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस(संघटन) अँड नितीन भोसले यांनी केले तर आभार रामदास कोळगे यांनी केले.

Post a Comment

Adds By Google

 
Top