0

इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी
भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी उस्मानाबाद तालुक्यातील पाटोदा येथे अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या हनुमंत निलंगे शेतकऱ्याच्या शेतीची दि.15 ऑक्टोंबर 2020 रोजी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधुन चर्चा केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे, असे सांगितले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, किसान मोर्चाचे जिल्हा प्रभारी रमेश पोकळे, किसान मोर्चा सचिव रंगनाथ सोळंके, किसान मोर्चा संपर्क प्रमुख रामदास कोळगे, जि.प.माजी अध्यक्ष नेताजी पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

Adds By Google

 
Top