0

काटी - (उमाजी गायकवाड) 
तुळजापूर तालुक्यात  झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, अगदी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला आहे. एकीकडे कोरोणाचे संकट तर दुसरीकडे पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि. (16) रोजी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. अनिल काळे, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, तालुका अध्यक्ष संतोष बोबडे, आदी भाजपच्या  प्रमुख पदाधिकाऱ्यांसह तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी, सांगवी, सिंदफळ,काक्रंबा, अपसिंगा, गंधोरा, अणदुर, चिवरी फाटा, दहिटना, किलज, होर्टी, मेसाई जवळगा, सलगरा (दि)   काटगाव, दिंडेगाव, कसई आदी गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून तहसीलदार, व संबंधित अधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले. तुळजापूर तालुक्यात सलग सोळा ते सतरा तास पडलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान झाले असून या पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले असून बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतामधील सोयाबीन,ऊस,आदी नगदी पिकांचे नुकसान होवून शेतकऱ्यांचा शेतात पावसाचे पाणी साचून तळ्याचं स्वरुप प्राप्त झाले होते. पिकाचे झालेल्या नुकसानीची पाहणी करुन जोरदार पावसामुळे हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली.  

   यावेळी आ.राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड.अनिल काळे,  तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, नेताजी पाटील, नारायण नन्नवरे, आनंद कंदले, अॅड.दिपक आलुरे, अण्णासाहेब सरडे, विजय शिंगाडे, वसंत वडगावे,  बालाजी शिंदे, बाबा बेटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Adds By Google

 
Top