0

कळंब (प्रतिनिधी) -
गटशिक्षण कार्यालय कळंब येथील सेवक बिभिषण जगताप [ओमन] यांचा मुलगा रोहन जगताप यांने वैद्यकीय प्रवेशासाठी घेतलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत ६४५ गुण घेऊन यश संपादन केले आहे.
त्यांने आँल इंडीया रँक ४७९१ इडब्लुएस रँक ४०७ घेतला आहे. रोहन चे वडील श्री. बिभिषण जगताप[ओमन] गटशिक्षण कार्यालय कळंब येथे सेवक म्हणून कार्यरत असुन ते १००% अंध आहेत. त्यास राज्यातील चांगल्या वैद्यकीय काँलेजला प्रवेश मिळु शकतो.
या यशाबद्दल रोहनचे गटशिक्षणाधिकारी परमेश्वर भारती, शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे ,शिक्षण विस्तार अधिकारी धर्मराज काळमाते, सुशिल फुलारी व मधुकर तोडकर यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Adds By Google

 
Top