0

इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसाने दि. 13 ऑक्टोंबर व दि. 14 ऑक्टोंबर 2020 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व मंडळात अतिवृष्टी झाल्याने हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी भयानक आर्थिक संकटात सापडला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी दि.16 ऑक्टोंबर 2020 रोजी परंडा तालुक्यातील सोनारी येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर वरील क्षेत्र बाधित झाले असून शेतकऱ्यांची सोयाबीन, ऊस, तूर, भुईमूग, कोथिंबीर, मका, तीळ, बाजरी, सिमला मिरची,कापूस, यासह आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे द्राक्षे, केळी, पपई, सिताफळ, आदि, फळबाग व ऊस भुईसपाट होऊन नुकसान झाले आहे. पूर्वीच कर्जबाजारी असलेल्या शेतकरी हा यंदा शेतात पीक जोमात आल्याने आपल्या खांद्यावरील कर्जाचे डोंगर कमी होईल, या आशेने आनंदित होता. परंतु मुसळधार अतिवृष्टी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील काढून व झाकून ठेवलेले डिगारे अक्षरक्षः पाण्याच्या प्रवाहासोबत नदीमध्ये वाहून गेले आहेत. तर ज्या शेतकऱ्यांची अजून सोयाबीन व इतर पिके काढायची होती ते पिके हे भिजून वाहून जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तरी शासनानी पंचनाम्याची अट रद्द करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, याबाबत मी जिल्हाधिकारी व महसूलच्या प्रशासनाशी बोललो आहे. तरी याबाबत पाठपुरावा करुन संपूर्ण जिल्ह्यात व तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत मिळऊन देऊ,  व मी शेतकऱ्यांसाठी खंबीरपणे उभा आहे असे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजकूमार पाटील, जिल्ह्याचे चिटणीस अॕड.गणेश खरसडे, बिभीषण हांगे, विलास खोसरे, अविनाश ईटकर, दशरथ मोरे, दत्ता हांगे, दत्ता हांगे, पदमाकर तोडकरी, शहाजी गाडे, कैलास तोडकरी, यांच्यासह शेतकरी व नागरीक उपस्थित होते.

Post a Comment

Adds By Google

 
Top