0

कळंब (प्रतिनिधी) -
        महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने फेब्रुवारी 2020 मध्ये घेतलेल्या इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हावरगाव ता.कळंब  शाळेतील ०९ विद्यार्थी पात्र झाले आहेत.
          त्यामध्ये प्रथम क्रमांक समृद्धी लक्ष्मण उमाप- 202 गुण, द्वितीय क्रमांक ऐश्वर्या राचलिंग गुळवे-180 गुण, तृतीय क्रमांक तनुजा प्रकाश चौधरी-162 गुण घेऊन क्रमांक पटकाविला आहे. तसेच इतर विद्यार्थी वावरे शुभम बिभीषण -158 राऊत नागेश हरी -156  कोकाटे श्वेता तात्यासाहेब - 144 गुण , प्राची बालाजी भोसले, -142 गुण,  अभिजीत बाळासाहेब कोल्हे -136 गुण व हजारे सुमित पांडुरंग -134 गुण इत्यादी यशस्वी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
        प्राथमिक शाळा हावरगाव ही एक जिल्हा परिषदेची उपक्रमशील शाळा आहे. या शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याचा प्रयत्न केला जातो. या सर्व यश संपादन केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक श्री.संजय तांबारे , श्रीमती सिंधू तावरे (तांबारे ) , श्री. ताकपिरे सचिन सर, मुख्याध्यापिका  श्रीमती. मैनाबाई मुळे , श्रीमती सुनिता गायकवाड (तांबारे)  श्रीमती चंद्रकला कुटे , श्री प्रशांत पोते  व श्रीमती पुजा परीट ,सेवानिवृत्त शिक्षक श्री हिराचंद माळी यांचे मार्गदर्शन लाभले.
        या यशाबद्दल  गटशिक्षणाधिकारी परमेश्वर भारती ,शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे ,शिक्षण विस्तार अधिकारी सुशिल फुलारी,केंद्रप्रमुख सोमनाथ चंदनशिव ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. संदीपजी कोल्हे, सरपंच श्रीमती. हजारे ताई ,उपसरपंच श्री. चक्रधर (आप्पा )कोल्हे, पोलीस पाटील श्री. दत्तात्रेय कोल्हे  ,  व सर्व ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. 

Post a Comment

Adds By Google

 
Top