0

काटी - (प्रतिनिधी) - 
तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या 55 वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनाने उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी सोलापुर येथील खासगी रुग्लालयात मृत्यु झाला त्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद शहरातील तुकाराम गोविदराव वैध हे तामलवाडी पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते आठ दिवसापुर्वी त्याचा रिपोर्ट पॉझीटिव्ह आला होता. त्याचेवर उस्मानाबाद येथे उपचार सुरू होते परंतु तब्येत बिघाडल्यामुळे कोरोना उपचारासाठी सोलापुर येथील खासगी रुग्नालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी 55 वर्षीय तुकाराम वैद्य याचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी 1मुलगा 1 मुलगी 3 भाऊ, भावजय असा परिवार आहे.

Post a Comment

Adds By Google

 
Top