0

काटी - (उमाजी गायकवाड) 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे सोमवार दि. 21 रोजी देशाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या सुचनेनुसार येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस अशोक जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली कांदा निर्यात बंदी निषेधार्थ येथील बसस्थानकवर सकाळी दहा वाजता आंदोलन करण्यात आले.         
   केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने शेतकरी मोठा अडचणीत सापडला आहे. कांद्याच्या निर्यात बंदीचे पडसाद राज्यात उमटले आहेत. कांद्याच्या निर्यात बंदीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, तर राज्यभर या निर्यात बंदी विरोधात आंदोलनही करण्यात येत आहेत. लॉकडाऊन मध्ये शेतकऱ्यांच्या कुठल्याही पिकांना व भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आली आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस अशोक जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे यांच्या नेतृत्वाखाली येथील बसस्थानकावर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यांत आले.
    तत्पुर्वी तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांना निवेदन देण्यात आले. मोदी सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार आहे. तसेच केंद्र सरकारने केलेली कांद्यावरील निर्यात बंदी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारी आहे. तरी केंद्र सरकारने तात्काळ निर्यात बंदी उठवावी अशी मागणी काटी येथील राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि दत्तात्रय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अशोक जाधव, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, करीम बेग, बबन हेडे, त्रिगुणशील साळुंके, विश्र्वास बोराडे, दिलीप डोलारे, साजन क्षिरसागर, कृष्णाथ जाधव, किरण चव्हाण, दिनेश क्षिरसागर, कुंडलिक ठोंबरे, राहुल क्षिरसागर, विकास जाधव, संतोष डोलारे, सागर क्षिरसागर, विलास लोंढे, दयानंद साठे, सुरेश क्षिरसागर यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Adds By Google

 
Top