0

उमरगा (प्रतिनिधी) -

येथील समाज विकास संस्थेच्यावतीने नगरपालिका, तहसील कार्यालय, पोलिस  स्टेशन उमरगा ,उपजिल्हा रुग्णालय या शासकीय कार्यालयातील अधिकारी पदाधिकारी यांनी केलेल्या कोविड १९ या जागतिक  महामारी मध्ये जिवाची तमा न बाळगता केलेली  विशेष कार्य याचा गौरव म्हणून समाज विकास संस्थेच्यावतीने बेस्ट वर्क फॉर कोविड १९ या अवॉर्डने कर्मचारीवृंद य‍ांना सन्मानित करण्यात येनार असल्याची माहिती समाज विकास संस्थेचे सचिव भूमिपुत्र,संस्थापक अध्यक्षा तथा संचालिका विद्याताई वाघ  यांनी दिली. 
दि.२८.९ .२० रोजी दिवसभरात संबंधित कार्यालयाच्या हॉलमध्ये या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे .या कार्यक्रमासाठी मराठवाडा लोक विकास मंचचे अध्यक्ष मा. विश्वनाथजी तोडकर (आणा) उपाध्यक्ष भूमिपुत्र वाघ,बीड जिल्ह्यातील  जनविकास सामाजिक संस्थेचे प्रमुख रमेश भिसे हे उपस्थित राहणार आहेत.खालील वेळेप्रमाणे 
पोलिस स्टेशन ११ वाजता सकाळी.
 नगरपालिका १२ वाजता ,
तहसील कार्यालय दुपारी १ वाजता. उपजिल्हा रुग्णालय दुपारी ३ वाजता या प्रमाणे पुरस्कार  कार्यक्रम पार पडेल.
    पुरस्काराचे  स्वरुप हार, शाल, श्रीफळ, आणि ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाईल अशी माहिती समाज विकास संस्थेच्या  संचालिका विद्याताई वाघ यांनी दिली.

Post a Comment

Adds By Google

 
Top