Adds by Google

0

इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी
 एक हाताने अपंग असतानाही मुरूम येथील कुमारी श्रध्दा आप्पासाहेब मुंडासे हिने दहावीच्या परीक्षेत 92.20 टक्के गुण मिळवत उस्मानाबाद जिल्ह्यातील अपंग विध्यार्थ्यांमध्ये प्रथम श्रेणीत यश मिळवले आहे. अपंगत्वावर मात करत दहावीच्या परीक्षेत तिने मिळवलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. मुरूम येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कुलची ती विद्यार्थिनी आहे. कुमारी श्रध्दा ही बालपणापासूनच एक हाताने अपंग असलीतरी शिक्षणात मात्र कधीच मागे राहिली नाही.दहावी परीक्षेत तिने मिळवलेल्या यशाबद्दल नगरविकास शिक्षण मंडळ अध्यक्ष बापूराव पाटील तसेच प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक आणि शिक्षक तसेच महात्मा बसवेश्वर युवक मंडळ आणि  विविध सामाजिक संघटनांच्यावतीने कुमारी श्रद्धाचे अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

Adds By Google

 
Top