Adds by Google

0

पारा (राहुल शेळके) :

वाशी तालुक्यातील डोंगरवाडी शिवारात  सि.एन. बी. बंधारा गुतेदारानी  बांधून स्वतः सरपंचानी फोडून दिल्याची घटना घडली असून याबाबत ग्रामस्थानी उपअभियंता पाटबंधारे विभाग कळंब यांना दि. 28 जुलै रोजी निवेदन सादर केले असून प्रशासन याबाबत काय कारवाई करणार? याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
         याबाबत माहिती अशी की,पाठबंधारे विभाग कळंब कार्यालयांतर्गत डोंगरेवाडी येथे सर्वे नंबर 41/अ /1मध्ये सिमेंट नाला बंधारा बांधकाम जून 2020 मध्ये पूर्ण झाले होते. हे बांधकाम आराखड्यात दर्शविल्याप्रमाणे न करता संबंधित गुत्तेदार, निरीक्षक अभियंता, सरपंच यांनी संगनमत करून हा बंधारा सरपंचाचे फायद्यासाठी वेगळ्या जागी केला होता. मागील महिन्यात झालेल्या पावसाने हा बंधारा भरला.परंतु बंधाऱ्याच्या फुगवट्याचे पाणी सरपंचाच्या शेतात व विहिरीत पसरू लागल्याने सरपंचानी गेल्या हप्त्यात ब्लास्टिंग करून तो फोडला व पाणी काढून दिले.
      बंधाऱ्याचे बांधकाम हे निकृष्ट केले असून मंजूर आराखड्यात नमूद केल्याप्रमाणे आरसिसि बांधकाम,डबर, वाळू, सिमेंट, स्टिल याचा वापर कमी प्रमाणात केलेला आहे. हे बांधकाम गुत्तेदार पंजाब ढेपे, डोंगरेवाडी सरपंच अशोक भराटे, अभियंता पिंपळे यांनी संगनमत करून अत्यंत निकृष्ट केले असून दर्जाबाबत चौकशी झाली तर आपल्या अंगलट येऊ नये म्हणून सदरील बंधारा बेकायदेशीररित्या फोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे. तरी या बाबीची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी. अशा आशयाचे निवेदन माहितीस्तव कार्यकारी अभियंता उस्मानाबाद, उपविभागीय अभियंता लघु पाटबंधारे उपविभाग परांडा, 
गटविकास अधिकारी वाशि  यांना दिले आहे.निवेदनावर सुभाष कुरुंद आणि शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. खुद्द सरपंचाने अशा घटना केल्यावर गावाचे काय होणार? अशी चर्चा सध्या गावकरी करत आहेत.
       
# आम्ही शेतकऱ्यांनी निवेदन देवून कारवाईची मागणी केली आहे. प्रशासनाने येत्या काही दिवसात कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करणार आहोत. 
    सुभाष कुरुंद अर्जदार शेतकरी.
         
# सरपंचाच्या शेतात पाणी जात असल्यामुळे त्यांनी तो बंधारा ब्लास्टिंग च्या साह्याने नसून ब्रेकर च्या साह्याने फोडला अशी माहिती मिळाली आहे.आम्ही तो बंधारा फोडलेल्या ठिकाणी बुजवून घेणार आहोत.सरपंचाच्या शेतात पाणी जातेय त्या ठिकाणी थोडे माती काम करून घेऊन बंधारा पूर्ववत करणार आहोत. 
    आर. यू. पिंपळे 
शाखा अभियंता 
लघु पाटबंधारे उपविभाग परांडा.

Post a Comment

Adds By Google

 
Top