Adds by Google

0

काटी - (उमाजी गायकवाड) 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील सरपंच आदेश जालिंदर कोळी यांना कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागन झाली होती. त्यांच्यावर लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. काटीतील दररोज वाढत्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संख्खेमुळे  नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. मात्र, आजचा दिवस काटीतील नागरिकांसाठी दिलासा  देणारा ठरला. आज बारा दिवसानंतर सरपंच पूर्णपणे बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात  आल्याने गावात दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले. सरपंचासह इतर अकरा कोरोना रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत.
          यावेळी ग्रा.प. मकरंद देशमुख, जितेंद्र गुंड, बाळासाहेब भाले, अनिल बनसोडे, करीम बेग,अतुल सराफ, अरविंद कोळी, शहाबुद्दीन शेख,दत्ता छबिले आदीजण उपस्थित होते.

Post a Comment

Adds By Google

 
Top