Adds by Google

0

काटी - (उमाजी गायकवाड) - 

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे दिवसेंदिवस कोरोना पेशंटच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून गावात 19 रुग्ण आढळून आल्याने काटी हे गाव कोरोना हॉट्सपॉट बनत चालले आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना ग्रामपंचायतीच्या वतीने घरात थांबण्याचे आवाहन करण्यात येत. दोन वेळा जनता कर्फ्युही पुकारण्यात आला होता. परंतु आवश्यक कामासाठी नागरिकांना घराबाहेर पडावे लागत आहे.  अत्यावश्यक सेवेत अन्नधान्याचा समावेश असल्याने रेशन दुकानातून धान्य वितरण करण्यासाठी येथील अमरसिंह निंबाळकर या  रेशन दुकानदाराने अनोखी शक्कल लढवली आहे. सोशल डिस्टन्सिंगसाठी या दुकानदाराने वजन केलेला माल एका पाईपमधून ग्राहकाला देण्यास सुरुवात केली, याची काटीसह परिसरात चांगलीच चर्चा सुरु आहे. अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करावे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, कामा व्यतिरिक्त घराबाहेर जाणे टाळावे, एकमेकांचा संसर्ग टाळावा, असे सांगितले जात असताना हा संसर्ग टाळण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील काटी   गावच्या अमरसिंह निंबाळकर (दुकान क्रमांक 2) या स्वस्त धान्य दुकानदाराने एक अनोखी शक्कल लढवली आहे.या दुकानदाराने विटांचा एक चबुतरा बांधून या चबुतऱ्यामधून धान्य देण्यासाठी एक प्लॅस्टिक  पाईप दुकानातून बाहेर काढला. तराजूत धान्याचे वजन केल्यानंतर तराजुजवळ लावलेल्या पाईपमधून हे धान्य वितरीत केले जात आहे. पाईपचे एक टोक तराजुजवळ तर दुसरे टोक दुकानाबाहेर काही अंतरावर ठेवले. त्यामुळे दुरूनच नागरिकांना हे धान्य घ्यावे  लागत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका टळत आहे.

Post a Comment

Adds By Google

 
Top