Adds by Google

0

काटी - (उमाजी गायकवाड) -  

तुळजापूर तालुक्यातील काटी येथे गुरुवार दि. 30 रोजी आलेल्या रिपोर्टमध्ये पुर्वीच्या कोरोनाबाधित पेशंटच्या संपर्कातील गुरुवारी  दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असतानाच शुक्रवार दि.31 रोजीच्या रिपोर्ट मध्ये आणखी चार रुग्णांचा समावेश झाला असून या कोरोना पॉझिटिव्ह  चार रुग्णांपैकी तिघांनी प्रायव्हेट लॅबमध्ये स्वॅब दिला होता. या चार पैकी पुर्वीच्या  कोरोनाबाधित तिघांच्या कुटूंबातील तीन महिला सदस्यांचा समावेश आहे. तर एकजण कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील पुरुष रुग्ण आढळून आला आहे‌.
त्यामुळे आता काटी येथील रुग्णांची संख्या आता तेवीसवर गेली आहे.तर अकरा रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत.काटी येथे  रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने हि वाढ थांबणार कि नाही या भितीने नागरिक धास्तावल्याचे चित्र दिसून येत आहे. 

Post a Comment

Adds By Google

 
Top