मुस्लिम बांधवांनी रमजान ईद साधेपणाने साजरी करावी, सरपंच परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ.झीनत सय्यद यांचे आवाहन - Osmanabad Live News, Latest News Osmanabad, Majhi Batmi, Marathi Batmi

Latest

Advertise By Google

Thursday, May 21, 2020

मुस्लिम बांधवांनी रमजान ईद साधेपणाने साजरी करावी, सरपंच परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ.झीनत सय्यद यांचे आवाहन

अनिल आगलावे 

तुळजापूर - मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान ईद सर्वात महत्वाचा सण अत्यंत साधेपणाने साजरा करावा. खरेदीसाठी मार्केटमध्ये विनाकारण गर्दी न करता, प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, ईदसाठी नवीन कपडे, सौंदर्य साधने खरेदी न करता, ईदच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम गरीब गरजूवंतांना देवून सन 2020 सालची रमजान ईद (ईद उल फितर) साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन सरपंच परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ.झीनत कोहिनुर सय्यद यांनी केले आहे.

गेल्या दोन महिन्यापासून कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागु करण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्हयातही कडकडीत बंद पाळण्यात येत असून, याचा आर्थिक फटका सर्वांनाच बसला आहे. सलग दोन महिन्यापासून कामधंदा बंद असल्यामुळे या वर्षीची रमजान ईद नवीन कपडे, सौंदर्य साधने खरेदी न करता, लॉकडाऊनचे पालन करीत
अत्यंत साधेपणाने साजरी करावी आणि जास्तीत जास्त बांधवांनी ईदच्या खरेदीसाठी खर्च होणारी रक्कम गरजूवंतांना मदत करून रमजान ईद साधेपणाने साजरी करावी.

शासन, प्रशासनासह अनेक दानशुर व्यक्ती मदतीचा हात पुढे करीत असले तरी सर्वसामान्य कुटूंबियांना आजही आपलं पोट भरण्याचा प्रश्न भेडसावत आहे. गेल्या दोन महिन्यापासून लॉकडाऊन सुरू असल्याने त्याचा आर्थिक फटका सर्वांनाच बसला आहे. शहरात अनेकांना गेल्या दोन महिन्यापासून हाताला काम नसल्यामुळे आर्थिकदृष्टया ते अडचणीत आले आहेत, इतरांप्रमाणे ते रमजान सण साजरा करू शकणार नाहीत. रोज कमवावे तेंव्हा खावे अशा कुटूंबियांचे या लॉकडाऊनच्या काळात साध्या पध्दतीने सुध्दा ईद साजरी करणे अशक्य होणार आहे, त्यामुळे ते हवालदिल झाले आहेत. 

मुस्लीम धर्मामध्ये पाच तत्वापैकी रोजा प्रमाणे जकातलाही विशेष महत्व दिले जाते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची महागडी खरेदी न करता, नवीन कपडे, सौंदर्य साधने खरेदी न करता, अशा संकटाच्या काळात मानवतेच्या तत्वांचे पालन करून, जास्तीत जास्त गरीब गरजूवंतांना मदत करून सन 2020 सालची रमजान ईद नेहमीसारखी उत्सवी न करता, ईदच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम गरीब गरजूवंतांना देवून साधेपणाने रमजान सण साजरा करावा, तसेच रमजानच्या काळात ईदसाठी खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये विनाकारण गर्दी करू नये, या लॉकडाउनच्या काळात घरी राहणे, सोशल डिस्टंसींगचे पालन करून, वयोवृध्दांची काळजी घेऊन, प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन सौ.झीनत कोहिनुर सय्यद यांनी केले आहे.

Advertise By Google