0

इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी
संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट वाढत आहे. कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परंतु सध्या संगणक,विज्ञान व दूरसंचार क्षेत्रात क्रांतीकारी पाऊल उचलून सोशल मिडीयाच्या माध्यमातून ' करलो दुनिया मुठीमें ' या संगणक युगाचे प्रणेते म्हणून ज्यांनी वेगळी ओळख जगात निर्माण केली असे भारतरत्न तथा भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची आठवण तरुणांना झाल्याशिवाय राहत नाही. तंत्रज्ञानात अमुलाग्र क्रांतीकरून ग्रामीण जनतेची नाळ जगासोबत मोबाईलद्वारे जोडण्याचे प्रभावी साधन जनतेच्या हाती देणारे स्व.राजीव गांधी यांची मुरुम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्व.राजीव गांधी यांच्या ३० वा स्मृतीदिन विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्यावर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करून साध्या पध्दतीने साजरा करण्यात आली. विठ्ठलसाई सहकारी कारखान्याच्या प्रांगणातील स्व.राजीव गांधी यांच्या पुर्णावृती पुतळ्यास गुरूवार (ता.२१) रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.बी.आथनी, चिफ इंजिनीअर अतुल आष्टेकर, चिफ केमीस्ट सुरेश गायकवाड, केन अकाऊंटट राजु पाटील, कार्यालयीन अधिक्षक कल्याणी चौघुले, आनंद मानाळे, शिवचंद्र मेनसे, अभियंता सोनाली भुसणगे, व्यंकट जाधव, सुभाष माळवदे, शिवराज सोलापूरे, सहदेेव गिराम आदींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. मुरूम शहर व परिसरातील विविध संस्था व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Post a Comment

Adds By Google

 
Top