उमरगा तालुका भाजपा यांच्यावतीने संपर्क कार्यालयासमोर महाराष्ट्र बचाव आंदोलन संपन्न - Osmanabad Live News, Latest News Osmanabad, Majhi Batmi, Marathi Batmi

Latest

Advertise By Google

Friday, May 22, 2020

उमरगा तालुका भाजपा यांच्यावतीने संपर्क कार्यालयासमोर महाराष्ट्र बचाव आंदोलन संपन्न

इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी
राज्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून या आपत्ती विरोधात लढण्यासाठी कोणतीही प्रभावी उपाय योजना राज्य सरकारने केली नसल्याचा आरोप करत राज्य सरकार विरोधात भाजपा प्रदेश सरचिटणीस विधान परिषदचे मुख्य प्रतोद आ. सुजितसिंह ठाकुर, आ. राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा तालुका भाजपा यांच्यावतीने संपर्क कार्यालयात  मेरा आंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संताजी चालुक्य, भाजपा तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, समाज कल्याण सभापती दिग्विजय शिंदे, माजी तालुकाध्यक्ष माधव पवार, सिद्धेश्वर माने, यांच्यासह भाजपा शहरातील व तालुक्यातील भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेरा आंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक यांनी स्वत:च्या घरी, गॅलरीत, अंगणात सोशल डिस्टन्स पालन करुन घरातील सदस्यांसह एकत्र येवुन तोंडाला काळा मास्क, काळा रुमाल, डोक्याला काळी ओढणी बांधुन काळ्या फिती लावुन काळे कपडे परिधान करुन निषेधाचे काळे फलक व विविध मागण्यांचे फलक हातात घेवुन राज्य सरकारचा जाहिर निषेध केला.

Advertise By Google