0

उस्मानाबाद - 

उमरगा शहरातील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आली असून 50 दिवसानंतर उमरगा येथे रुग्ण आढळल्याने उमरगा शहरासह  उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे आणि नागरिक दक्ष झाले आहेत,  सदरची महिला मुंबई येथून 4 दिवसांपूर्वी उमरगा येथे आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा 17 वर गेला असून 4 जण बरे झाले आहेत तर 13 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सदरील रुग्ण हा ST कॉलनी जवळील मुकबधीर शाळेच्या जवळ राहत असून या भागासह उमरगा शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. या महिलेसह इतर 25 जण  आले असून त्यांची अधिक माहिती घेणे सुरू आहे.

Post a Comment

Adds By Google

 
Top