Adds by Google

0

केज (प्रतिनिधी) – कळंब पोलीस उपविभागीय कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचारीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विवेकानंद विलास गिरी असं या पोलीस कर्मचाऱ्याच नाव असून (वय अंदाजे 30) केज येथील आपल्या गावावरून कळंब येत असताना त्यांच्या चारचाकीवरचा (MH44S 4302) ताबा सुटला आणि अचानक गाडी पलटी झाली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ही दुर्दैवी घटना आज दि. 28 मे रोजी सायंकाळी 6 वाजता चिंचोली पाटी जवळ घडली आहे. कळंब येथे कार्यरत असलेले गिरी हे दररोज केज येथे आपल्या खासगी गाडीत येजा करत होते.नेहमी प्रमाणे प्रवास करत असतांना गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. अपघाताची माहीती मिळताच केज पोलीसानी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने कळंब पोलिसात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Adds By Google

 
Top