शिस्तप्रिय असा देवगड संस्थानचा आषाढी पायी दिंडी सोहळा या वर्षी रद्द. देवगड संस्थानचे मठाधिपती महंत भास्करगिरी महाराज यांची माहिती - Osmanabad Live News, Latest News Osmanabad, Majhi Batmi, Marathi Batmi

Latest

Advertise By Google

Saturday, May 23, 2020

शिस्तप्रिय असा देवगड संस्थानचा आषाढी पायी दिंडी सोहळा या वर्षी रद्द. देवगड संस्थानचे मठाधिपती महंत भास्करगिरी महाराज यांची माहिती

नेवासा - (दादा दरंदले) 
नेवासे तालुक्यातील श्री दत्त मंदिर संस्थान श्री क्षेत्र देवगड येथील सद्गुरू किसनगिरीबाबा यांचा पायी दिंडी सोहळा हा देवगडहुन पंढरपूरपर्यंत दरवर्षी जात असतो मात्र या वर्षी कोरोना या माहामारी मुळे शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सण उत्सव न घेण्याचे आवाहन केले त्यामुळे या वर्षी श्री क्षेत्र देवगड ते पंढरपूर हा आषाढी पायी पालखी दिंडी सोहळा रद्द केला असे देवगड संस्थानचे मठाधिपती महंत भास्करगिरी महाराज यांनी सांगितले

       पांढराशुभ्र ड्रेस परिधान केलेले वारकरी,टाळ मृदुगाच्या माऊलीच्या जय घोषात ही दिंडी पंढपुर कडे प्रस्थान करत असते प्रशासनाने परवानगी दिली तर पंढपुर येथील श्री क्षेत्र देवगड संस्थानच्या मठात  श्री समर्थ किसनगिरीबाबांच्या पादुका घेऊन जात विधिवत पूजा केली जाईल परंतु हा निर्णय कोरोनाचा प्रादुर्भाव आषाढी एकादशीच्या वेळेस किती राहील यावर अवलंबून राहील असेही महंत भास्करगिरीजी महाराजांनी नमूद केले.

Advertise By Google