Adds by Google

0

भूम (अनिल आगलावे) - 
ग्रामपंचायत कार्यालय बेलगाव पिंपळगाव तालुका भूम च्या महिला सरपंच सौ जिनत कोहिनूर सय्यद यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईद साध्य पद्धतीने करून  ईद वरती जास्त खर्च न करता गरुजूवंतांना मदत करावी असे आव्हान केले होते.याच  पार्श्वभूमी वरती सरपंच सौ जिनत कोहिनूर सय्यद यांच्या कडून सर्व गरजुवंत मुस्लिम बांधव,गरजुवंत गरीब व मागासवर्गीय लोकांना साखरेचे वाटप करण्यात आले.

अनेक उपक्रम सौ जीनत सय्यद यांनी कोरोनामुळे उदभावलेल्या संकट काळात राबवले आहेत. याची दखल घेऊन पंचायत समिती भूमचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी राजू कांबळे  यांची  सामाजिक उपक्रमासाठी उपस्थिती होती.त्यांच्या हस्ते सर्व गरजूवंतांना साखरेचे वाटप करण्यात आले.तसेच 14 व्या वित्त आयोगा अंतर्गत या प्रसंगी जनतेला सॅनिटाइझर व मास्कचे  वाटप करण्यात आले."

कोरोना सारख्या संकट समयी सरपंच सौ. जीनत सय्यद या,समाजाची बांधिलकी म्हणून जे स्तुत्ये उपक्रम राबवत आहेत ते कौतुकास्पद आहेत " असे उद्गार गट विकास अधिकारी राजू कांबळे  काढले. या कार्यक्रम प्रसंगी मराठवाडा विभाग शिक्षक संघटक कोहिनूर सय्यद, ग्रामसेवक तालुका अध्यक्ष कुलकर्णी, ग्रामसेवक राऊत,उपसरपंच लादूबी शेख,ग्रा पं स गोकुळ मस्के,माजी पोलीस पाटील लायक अली सय्यद,चेअरमन हुजूर सय्यद व समस्त गावकरी हजर होते.

Post a Comment

Adds By Google

 
Top