0

इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी
आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी कोरोना आपत्ती लक्षात घेऊन प्रादुर्भाव रोखण्यासाठी व उपचार लवकर व्हावेत म्हणून परंडा हे तालुक्याचे ठिकाण असूनही उपजिल्हा रूग्णालयात अथवा खाजगी रूग्णालयात आयसीयु, व्हेंटीलेटर सुविधा नाही. परंडा येथील उपजिल्हा रूग्णालयात आयसीयु व्हेंटीलेटर व आयसोलेशन वार्ड/क्वारंटाईन वाॅर्ड करण्यासाठी २९ मार्च २०२० रोजी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना पत्र देऊन १५ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला करून दिला आहे. आज परंडा येथील उपजिल्हा रूग्णालयात ५ कोरोना बाधित रूग्ण आहेत. मात्र उपरोक्त सुविधा नाहीत. निधीचे पत्र देऊन २ महिने होत आले तरी जिल्हा प्रशासनाकडून गतीने काहीच कार्यवाही नाही. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना संक्रमित रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी अन्य जिल्ह्यात तपासणीसाठी पाठविले जातात. त्यांचे अहवाल येण्यास विलंब लागतो. उस्मानाबाद येथेच स्वॅब तपासणी होऊन लवकर अहवाल प्राप्त व कोरोना रूग्णांवर तातडीने उपचार सुरू करता यावेत म्हणून बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात कोरोना विषाणू तपासणी केंद्र निर्माण करण्याकरिता इतर तत्सम वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करणेसाठी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी आपल्या आमदार सथानिक विकास कार्यकम निधीतून २५ लक्ष रुपये निधी २३ एप्रिल २०२० रोजी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना पत्र देऊन उपलब्ध करून दिला आहे. त्यावरही एक महिना होत आला तरी अद्याप काही कार्यवाही नाही. या दोन्ही बाबतीत पाठपुरावा करूनही नको त्या बाबतीत तत्परता दाखविणा-या प्रशासनाकडून अतिआवश्यक असलेले काम कासवगतीने चालू आहे. खरे तर या कोरोना महामारी संकटाच्या काळात परिस्थितीचे गांभीर्य व आवश्यकता लक्षात घेऊन युध्दपातळीवर काम होणे अपेक्षित आहे. आज याबाबतीत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे मॅडम यांना संपर्क करून आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Post a Comment

Adds By Google

 
Top