Adds by Google

0

इकबाल मुल्ला

स्मानाबाद

परंडा शहरातील नागरीकांचे नळपट्टी व मालमत्ता कर, नगरपालिका मालकीच्या जागा व गाळेधारकांचा सन २०२० - २१ मधील कर माफ करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन भाजपा शहराध्यक्ष अॅड. जहिर चौधरी यांनी मुख्याधिकारी यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे कि, सन २०२० च्या सुरुवातीलाच कोविड (कोरोना व्हायरस) मुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. व सततच्या लाॅकडाऊनमुळे सलग दोन महिने नागरिक तसेच गाळेधारकांना आपला कोणताही व्यवसाय करता न आल्याने सध्या सामान्य नागरिक तसेच गाळेधारक दुकानदार नगरपरिषदचे पोटभाडेकरी यांच्यासमोर उपासमारीची वेळ आली आहे. व भविष्यात रुग्ण वाढल्यास जनता कर्फ्यू तसेच वेळोवेळी जिल्हाधिकारी व आपल्या आदेशान्वये बाजारपेठा तसेच इतर व्यवसाय पुर्ण क्षमतेने सुरू नसल्याने परंडा शहरातील नागरिकांसमोर निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत परंडा नगरपरिषद यांनी चालु वर्षाचा करार माफ करुन दिवाळखोरीत निघालेल्या जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. या निवेदनावर भाजपा शहर अध्यक्ष ॲड जहीर चौधरी, नगसेवक प्रतीनीधी अन्वरभाई लुकडे, समीरभाई पठाण ,ॲड अभयसींह देशमुख, जोयब हावरे यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

Adds By Google

 
Top