आ.सुजितसिंह ठाकुर यांनी परंडा तालुका भाजपा संपर्क कार्यालयासमोर केले महाराष्ट्र बचाव आंदोलन - Osmanabad Live News, Latest News Osmanabad, Majhi Batmi, Marathi Batmi

Latest

Advertise By Google

Friday, May 22, 2020

आ.सुजितसिंह ठाकुर यांनी परंडा तालुका भाजपा संपर्क कार्यालयासमोर केले महाराष्ट्र बचाव आंदोलन

इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी
राज्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना या आपत्ती विरोधात लढण्यासाठी प्रभावी उपाय योजना करण्यात  राज्य सरकार  अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपा प्रदेश सरचिटणीस विधान परिषदचे मुख्य प्रतोद आ. सुजितसिंह ठाकुर यांनी परंडा तालुका भाजपा संपर्क कार्यालयासमोर  मेरा आंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव आंदोलन केले. 
 यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, भाजपा शहराध्यक्ष अॅड.जहिर चौधरी, विस्तारक श्रीकांत सानप, गणेश राशनकर, उपस्थित होते. व नगरपरिषदचे गटनेते सुबोध सिंह ठाकुर, सिद्दीकी हान्नुरे, यांच्यासह भाजपा शहरातील व तालुक्यातील भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेरा आंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक यांनी स्वत:च्या घरी, गॅलरीत, अंगणात सोशल डिस्टन्स पालन करुन घरातील सदस्यांसह एकत्र येवुन तोंडाला काळा मास्क, काळा रुमाल, डोक्याला काळी ओढणी बांधुन काळ्या फिती लावुन काळे कपडे परिधान करुन निषेधाचे काळे फलक व विविध मागण्यांचे फलक हातात घेवुन राज्य सरकारचा जाहिर निषेध केला.

Advertise By Google