औरंगाबामध्ये कोरोनाचा 34 वा बळी, आज 59 कोरोना रुग्णांची वाढ, एकूण रुग्णसंख्या 1021 - Osmanabad Live News, Latest News Osmanabad, Majhi Batmi, Marathi Batmi

Latest

Advertise By Google

Monday, May 18, 2020

औरंगाबामध्ये कोरोनाचा 34 वा बळी, आज 59 कोरोना रुग्णांची वाढ, एकूण रुग्णसंख्या 1021


औरंगाबाद. औरंगाबाद जिल्ह्यात काेराेनाचा कहर वाढत चालला आहे. औरंगाबाद शहरात आज 59 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1021 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. तसेच, आणखी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पैठणगेट येथील 56 वर्षीय स्त्री आणि बुढिलेनमधील 42 पुरुषचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासोबतच औरंगाबादमधील कोरेनात 34 बळी गेले आहेत.
औरंगाबाद शहरात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
पैठण गेट, सब्जी मंडी (1), किराडपुरा (1), सेव्हन हिल कॉलनी (1), एन-6 सिडको (1), बायजीपुरा (1), रोशन नगर (1), न्याय नगर (3), बहादूरपुरा, बंजारा कॉलनी, गल्ली नं.2 (4), हुसेन कॉलनी (4), पुंडलिक नगर (2), हनुमान नगर (1), संजय नगर, गल्ली नं. पाच (1), हिमायत बाग, एन-13 ‍सिडको (1), मदनी चौक (2), सादाफ कॉलनी (1), सिल्क मील कॉलनी (8), मकसूद कॉलनी (6), जुना मोंढा (11), भवानी नगर (5), हिमायत बाग, जलाल कॉलनी (3), बेगमपुरा (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 27 महिला व 32 पुरुषांचा समावेश आहे.
सकाळी मदनी चौक येथील 65 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 13 तारखेला अहवाल पॉझिटिव्ह आला होता. खाजगी दवाखान्यातुन 16 तारखेला घाटीत दाखल झाले होते आणि 17 तारखेला या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची माहिती अरविद गायकवाड यांनी दिली आहे.
शनिवारी रात्रीपासून ते रविवारी सकाळपर्यंतच्या साडेतेरा तासांत या जीवघेण्या आजाराने तब्बल पाच जणांचे बळी घेतले आहेत. त्यामुळे शहरात काेराेनामुळे बळींची संख्या ३१ वर गेली आहे. विशेष म्हणजे आजवर ४० वर्षांपुढील शहरातील रुग्णांचेच काेराेनामुळे बळी गेले, मात्र रविवारी पहिल्यांदाच सर्वात कमी वयाच्या म्हणजे ३२ वर्षीय तरुण व ३५ वर्षीय महिला रुग्णाचाही बळी गेला. मृतांमध्ये तीन पुरुष व दाेन महिलांचा समावेश आहे. गेल्या दाेन महिन्यांत गेलेल्या ३१ बळींपैकी २८ जणांचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.दरम्यान, रविवारी औरंगाबाद जिल्ह्यात 61 जणांना काेराेनाची लागण झाली यात घाटीतील निवासी डाॅक्टरसह महिला पाेलिसाचा समावेश आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 1021 झाली. तर दिवसभरात 32 जण काेराेनामुक्त झाले.
औरंगाबादेत मृतांत ३ पुरुष,२ महिला
  • १६ मे सायं. ७.४५ : संजयनगरातील ५३ वर्षीय महिलेचा मृत्यू. १३ मे राेजी घाटीत दाखल. १५ मे राेजी पाॅझिटिव्ह. उच्च रक्तदाब, दम्याचाही त्रास.
  • १६ मे रात्री ९ : जलाल कॉलनी येथील ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू. १५ मे राेजी त्यांना घाटीत दाखल केले हाेते. १६ मे राेजी अहवाल पाॅझिटिव्ह आला. दोन्ही बाजूचा न्यूमाेनिया झाला होता.
  • १६ मे मध्यरात्री १ वा. : रोशनगेट गल्ली नं. ५ येथील ४२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. १५ मे राेजी त्यांना अॅडमिट केले हाेते, त्याच दिवशी अहवाल पाॅझिटिव्ह. त्यांना मधुमेहाचा त्रास होता.
  • १७ मे सकाळी ६ वा. : शंभूनगर गल्ली नंबर २९ मधील ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. १३ मे राेजी घाटीत दाखल, त्याच दिवशी पाॅझिटिव्ह. अॅक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम इन केस ऑफ कोविड रेट्रोव्हायरल डिसीजमुळे मृत्यू.
  • १७ मे सकाळी ९.१५ वा. : बुढीलेनमधील रऊफ कॉलनीतील ७४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. १५ मे राेजी अॅडमिट. याच दिवशी पाॅझिटिव्ह. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रासही हाेता.
सौजन्य दिव्य मराठी 

Advertise By Google