मराठवाड्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गुरुवारी विभागात ९८ नवीन रुग्ण आढळले. एकट्या औरंगाबादेत ६० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. जालना जिल्ह्यात तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बीड जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री ४ व गुरुवारी सायंकाळी १३ असे १७ नवे रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्याच्या शिराढोण येथील एक आणि उमरगा शहरातील एक, अशा दोन महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. नांदेडमध्ये ६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, लातूर जिल्ह्यातही गुरुवारी ५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. परभणीत ४ नवे रुग्ण सापडले. हिंगोलीत २८ वर्षीय तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
औरंगाबादेत तीन जणांचे मृत्यू; एकूण रुग्णसंख्या ११७९
शहरात गुरुवारी ६० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ११७९ वर पोहोचली आहे. गुरुवारी अाणखी तीन रुग्णांचे मृत्यू झाले. त्यामुळे एकूण बळींची संख्या ४२ वर गेली अाहे. तीन मृतांमध्ये अासेफिया काॅलनी, रहेमानिया काॅलनी व खडकेश्वर परिसरातील पुरुषाचा समावेश अाहे.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत कुठे काय परिस्थिती
> औरंगाबाद ग्रामीण : जैतापूरची (ता. कन्नड) प्रसूत महिला व पैठण येथील रुग्णालयातील ब्रदरचा अहवालही पॉझिटिव्ह आला.
> जालना : बाधितांमध्ये पती-पत्नी व भावाचा समावेश आहे. ते १७ मे रोजी मुंबईहून टेम्पोने आले.
> बीड : जिल्हा रुग्णालयात सध्या २९ जणांवर उपचार सुरू आहेत. यातील ६ जणांना पुण्याला हलवलेले आहे.
> उस्मानाबाद : जिल्ह्यात रुग्णसंख्या एकूण १८ वर गेली आहे.
> हिंगोली : राज्य राखीव दलाचे ५ जवान काेराेनामुक्त झाले. आैंढा नागनाथ येथील २८ वर्षीय तरुणीला कोरोनाचा संसर्ग झाला.
> लातूर : जिल्ह्यात गुरुवारी आणखी ५ कोरोनाबाधित रुग्ण सापडले.
> परभणी : गुरुवारी रात्री ४ नवीन रुग्णांची नोंद झाली. सर्वात प्रथम आढळलेला रुग्ण निगेटिव्ह होऊन घरी परतला आहे.
> नांदेड : येथे कोरोनामुक्त ५ रुग्णांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ११६ रुग्ण असून ४१ रुग्णांना सुटी देण्यात आली.

Adds By Google

 
Top