औरंगाबादमध्ये बळींची संख्या 35 वर, आज 51 रुग्ण वाढले, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1073 - Osmanabad Live News, Latest News Osmanabad, Majhi Batmi, Marathi Batmi

Latest

Advertise By Google

Tuesday, May 19, 2020

औरंगाबादमध्ये बळींची संख्या 35 वर, आज 51 रुग्ण वाढले, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1073


औरंगाबाद. औरंगाबाद जिल्ह्यात आज 51 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1073 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे
रोहिदास नगर (1), शिवशंकर कॉलनी (1), जाधववाडी (1), जटवाडा रोड (1), हिमायत बाग (1), किराडपुरा (4), पुंडलिक नगर (1), मुकुंदवाडी (1), नारेगाव (1), जयभीम नगर (1), संजय नगर (1), रहिम नगर (1), कैलास नगर (1), गादल नगर (1), सादात नगर, गल्ली नं. 6 (4), शिवनेरी कॉलनी (1), विधिया नगर, सेव्हन हिल (1), गल्ली नं. 25, बायजीपुरा (4), दुर्गा माता कॉलनी, न्याय नगर (1), मकसूद कॉलनी (1), जाधववाडी (1), गल्ली नं. 23, बायजीपुरा (2), गल्ली नं. 3, बायजीपुरा (1), सातारा गाव (3), आदर्श कॉलनी, गारखेडा (3), गारखेडा परिसर (1), मित्र नगर (1), मिल कॉर्नर(1), शिवशक्ती नगर, मुकुंदवाडी (1), मुकुंद नगर, मुकुंदवाडी (1) अन्य (4) आणि गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा (3) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 17 महिला व 34 पुरुषांचा समावेश आहे.
औरंगाबादमध्ये 65 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू शहरातील 35 वा बळी
या व्यक्तीचा 18 तारखेला अहवाल पॉझिटिव्ह आला होता. जिल्हा रुग्णालयातुन घाटीत भरती करण्यात आले होते. त्यांना बीपी मधुमेह तसेच बायपास देखील झाली होती. 19 तारखेला सकाळी 12 वाजून 30 मिनिटाला मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टर अरविंद गायकवाड यांनी दिली आहे.
रविवारी रात्री व साेमवारी दिवसभरात आणखी तिघांचे मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३४ वर गेली.दरम्यान, रविवारी रात्री एकाचा तर साेमवारी सेवानिवृत्त अधिकाऱ्यासह गाड्यांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याचा काेराेनामुळे मृत्यू झाला.

आमचा अॅप डावुलोड करा Click Here

ही  बातमी शेअर करा 

Advertise By Google