घोडेगाव येथे कापड दुकानाला भीषण आग.10 लाख रु नुकसान - Osmanabad Live News, Latest News Osmanabad, Majhi Batmi, Marathi Batmi

Latest

Advertise By Google

Thursday, May 21, 2020

घोडेगाव येथे कापड दुकानाला भीषण आग.10 लाख रु नुकसान

घोडेगाव (दादा दरंदले) - 

घोडेगाव येथील भक्ती कापड दुकानाला गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. सकाळी 9 वाजताच्या सुमारास दुकान उघडली असता शॉटसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.टॉवेल, रुमाल, अंतर्वस्त्र आदी कापडी गठ्ठे आगीच्या भक्षस्थानी पडले. पंखे, लोखंडी आलमाऱ्यांचा रंग जळून ते काळेठिक्कर पडले. पंख्याची पाती वाकली. आतील भिंती काळ्या पडल्या. आगीमुळे प्रचंड तापमानात त्या खिळखिळ्या झाल्या.
सुमारे 10 लाखांचा माल जळून खाक झाला आहे. नगर औ बाद रोडवरील घोडेगाव येथील हे कापड दुकान आहे. आग विझविण्यासाठी शेजारील नारायण चौधरी यांनी तातडीने बोअरवेल ची पाण्याची मोटार चालू करून सहकार्य केले.त्याच बरोबर स्थानिक नागरिकांनीदेखील आग विझविण्याच्या कामात मदत केली. आगीमुळे दुकानांमधील सर्व कापडी माल जळून खाक झाला असुन या आगीमध्ये 10 लाख रुपयांची रुपयांचे नुकसान झाले असल्याचे  कापड दुकान मालक तुकाराम भरत जरे यांनी सांगीतले आहे

Advertise By Google